राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर नाराज – पुण्यातील बैठक गुंडाळून मुंबईला रवाना
पुणे -: पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले आहे. साधारण दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार होती. मात्र पदाधिकारी नसल्याचं पाहून राज ठाकरेंचा राज अनावर झाला आणि ते मुंबईच्या दिशेने निघाल
माणसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे नवी पेठेतील पक्ष कार्यालयातून निघून गेले. पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र नंतर या बैठकीची वेळ बदलून दोन करण्यात आली. दोन ते सव्वा दोन वाजता पदाधिकाऱ्यांना आणि विभागप्रमुखांना पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. राज ठाकरेदेखील सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात पोहचले होते. मात्र या शहरातील कार्यालयात मुख्य पदाधिकारी नव्हते. ज्यांना बैठकीला बोलवण्यात आलं होतं ते विभागप्रमुखही पोहचले नव्हते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विधानसभेच्या प्रत्येक प्रमुखाला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या सगळ्यांनी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होते. त्यामुळे पुणे मनसेसाठी ही बैठक महत्वपूर्ण होती. मात्र सव्वा तीन वाजता राज ठाकरे अचानक ही बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले.