अखेर पालिकेतील प्रभारींना बढती
मुंबई – सध्या पालिकेचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. त्यामुळे नागरी सुविधांच्या कामांना कुठेतरी खिळ बसली आहे अशा स्थितीत पालिकेतील प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी गेल्या दीड ते २ वर्षांपासून प्रभारींच्या खांद्यावर होती. प्रभारी म्हटला कि त्याच्या कामावर आणि अधिकारांवर मर्यादा येतात परिणामी त्याचा फटका त्यात्या विभागातील कामांना बसतो. याबाबत मुंबईकर जनतेने अनेक वेळा आवाज उठवूनही पालिका प्रशासनाला जाग येत नव्हती. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना होती अखेर नागरिकांचा संताप पाहून पालिकेच्या प्रमोशन क्मेची बैठक झाली आणि या बैठकीत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ११ आणि यांत्रिक व विद्युत विभागातील ४ उप् प्रमुख पदांवरील अभियंत्यांना प्रमुख अभियंता म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे सध्या अनेक खात्यांच्या प्रमुख अभियंतापदी प्रभारी असलेल्या उप प्रमुखांना बढती मिळाल्याने ते त्यांच्या पदी कायम झाले आहेत . तर अनेक उप प्रमुख पदावरील अधिकारी हे बढतीस पात्र असतानाही त्यांना डावलून इतरांना प्रमुख अभियंतापदी प्रभारी म्हणून नेमले होते. त्यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे कोस्टल रोड, नागरी प्रशिक्षण केंद्र आणि मुंबई मल निसारण प्रकल्प वभागाच्या प्रमुख अभियंतापदी या
डावललेल्या अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रभारी असलेल्याप्रमुख अभियंत्यांना कायम करण्यात आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पालिकेच्या विकास व नियोजन नगर अभियंता, इमारत देखभाल विभाग यांत्रिक व विद्युत विभाग , पाणी पुरवठा प्रकल्प, मलनिसारण आदी प्रमुख विभागात प्रमुख अभियंता हे पद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त होते . या पदांवर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याऐवजी आपल्या मर्जीतल्या लोकांना प्रभारी म्हणून नेमले होते त्यामुळे नागरी सुविधांच्या कामांवर परिणाम होत होता अखेर याविरुद्ध मुंबईकर जनतेने आवाज उठवताच झोपलेले प्रशासन जागे झाले आणि प्रमोशन कामेतीची बैठक घेऊन सेवा जेष्ठतेनुसार १५ उप् प्रमुखांना बढती देण्यात आली
प्रमुख अभियंता पदी कायम अधिकाऱ्यांचे नावे —
विकास नियोजन विभाग -सुनील राठोड
इमारत देखभाल विभाग- यतीन दळवी
नगर अभियंता – दिलीप पाटील (प्रभारी)
नागरिक प्रशिक्षण केंद्र- गोविंद गारुळे
रस्ते वाहतूक विभाग – मनीष पटेल
कोस्टल रोड- गिरीश निकम
पूल विभाग- विवेक कल्याणकर
यांत्रिक विद्युत विभाग-कृष्णा पेरेकर – प्रभारी
पर्जन्य जलवाहिनी- श्रीधर चौधरी
जल अभियंता विभाग-पुरुषोत्तम माळवदे
पाणी पुरवठा विभाग- पांडुरंग बंडगर
मला निसरण प्रकल्प- शशांक भोरे
मुंबई मलनिसारण प्रकल्प- राजेश तामणे
मल निसारण प्रचलन – प्रदीप गवळी
घनकचरा व्यवस्थापन- प्रशांत तायशेटे
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प- सुधीर परकाळे