ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

महाविकास आघाडी आणि भाजपतील चर्चा अखेर निष्फळ

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळ
मुंबई/ राज्य सभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी भाजपने आपला तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार अटळ आहे.
राज्य सभेची निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघडीचीचे नेते छगन भुजबळ,अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट घेतली आणि तिसरा उमेदवार भाजपने मागे घ्यावा त्या बदल्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पाचव्या उमेदवाराला आम्ही मदत करू असा प्रस्ताव दिला .मात्र राज्यसभेची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची असल्याने तुम्ही माघार घ्या आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला मदत करू असे भाजपा कडून सांगण्यात आले . त्यामुळे चर्चा फिस्कटली आणि अर्ज मागे घण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे धनंजय महाडिक मैदानात राहिल्याने महाडिक आणि सेनेचे संजय पवार यांच्यात सहाव्या जागेसाठी सामना अटळ आहे त्यामुळे दोन्ही पक्षांकडून घोडेबाजार होणार असून त्यात अपक्षांची चांदी आहे .

error: Content is protected !!