ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट

बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेत
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी ओडिशाच्या नागरिकांचे देखील यावेळी आभार मानले. बचावरकार्यासाठी रेल्वेकडून युद्धपातळीवर करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं. ‘ही घटना अनेक गोष्टी शिकवून गेली आहे, त्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी प्रयत्न सरकारकडून करण्यात येतील’ असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.
शुक्रवारी संध्याकाळी बालासोरमधील बहनगा स्थानाकाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की, करोमंडल एक्सप्रेस रुळावरुन खाली उतरली. या अपघातात सुरुवातील मृतांची संख्या 50च्या आसपास होती मात्र त्यानंतर या रेल्वे अपघातातील मृतांचा आलेख वाढतच गेला. आतापर्यंत या अपघातात २९४ जणांचा मृत्यू झाला असून १११७ जण जखमी झाली आहेत. करोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच वेळी रुळावर आल्याने हा अपघात झाला. अनेक प्रवासी या अपघातात अडकले असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे संपूर्ण परिसरात गर्दी आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. एनडीआरएफ, रेल्वे यांच्या पथकाकडून अनेक लोकांना सुखरुप बाहेर देखील काढण्यात आले. परंतु मृतांचा आकडा जास्त असल्याने त्यांची ओळख पटवून देण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे

error: Content is protected !!