भाजपने पहिली लढाई जिंकली -नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
मुंबई/ मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांचा शपथ विधी पार पडल्यानंतर काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे/ भाजप सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची पहिली लढाई जिंकली आणि भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले त्यामुळे नव्या सरकारकडे निर्विवाद बहुमत आहे हे आता सिद्ध झाले आहे .त्यामुळे आज बहुमत चाचणीची औपचारिकता पर पडली जाईल
राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी नेत्यांची भाषणे त्यात एकमेकांना मारलेले टोमणे आणि अध्यक्ष पदाची निवडणूक यांनी गाजला अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर याना 166 तर महा विकास आघाडीचे राजन साळवी याना 106 मते पडली आणि राहुल नार्वेकर अध्यक्षपदी निवडून आले आता उद्या बहुमत चाचणी होणार असून ती भाजप सहज जिंकेल असे दिसते. कालच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि एम आय एम तटस्थ राहिले तर मनसेने भाजपला मतदान केले.