ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आता प्रतीक्षा नव्या मंत्रिमंडळाची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू


मुंबई/ भाजपा आणि शिंदे गट यांचे सरकार आता खऱ्या अर्थाने सतेवर आले आहे कारण रविवरी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यावर काल विश्वासदर्शक ठराव सुधा जिंकला त्यामुळे आता मंत्रिमंडळाची प्रतीक्षा आहे. तर आता मंत्री पदासाठी लॉबिंग सुरू झाले आहे
नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी आणि सुनील प्रभु यांची शिवसेना प्रतोदपदी झालेली निवड बेकायदेशीर ठरवली . त्यानंतर काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि ठरावाच्या बाजूने 164 तर विरोधात 99 मते पडली आणि सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आता मंत्रिमंडळ तयार केले जाणार आहे .भाजप आणि शिंदे गट यांच्या या संयुक्त मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी वेरणी लागावी यासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे लॉबिंग सुरू झाली आहे . शिंदे यांच्या सोबत सेनेतून फुटलेल्यांचे मंत्रिपद नक्की आहे पण तर भाजपात मुनगंटीवार,शेलार,महाजन दरेकर याना मंत्रिपद नक्की आहे पण इतरही बरेच इच्छुक आहेत त्यांचे काय करायचे असा प्रश्न फडणवीस आणि शिंदे दोघानाही आहे कारण सध्या तरी कोणताही धोका पत्करण्याची त्यांची इच्छा नाही
बॉक्स
अजितदादा विरोधी पक्ष नेते
काल विश्वास दर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली यावेळी बोलताना आपण विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला संपूर्ण सहकार्य करू तसेच सरकारवर अंकुश ठेवण्याचे कमी करू असे अजितदादा यांनी सांगितले .

error: Content is protected !!