ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या नेत्यांची हकालपट्टी


मुंबई/राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते व प्रतोद जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीत हकालपट्टी केली तर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची हकालपट्टी केली. दरम्यान आता राष्ट्रवादीला वाचवण्यासाठी स्वतः शरद पवार घराबाहेर पडले असून आज त्यांनी यशवंतराव यांच्या समाधीवर जाऊन त्याला आदरांजली वाहिली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या बरोबर होते. दरम्यान राष्ट्रवादीतून फुटून शिंदे सरकार मध्ये मंत्री म्हणून सामील झालेल्या नऊ जणांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली आहे तसेच त्यांना अपात्र करावे असे पत्रही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाधिकारी तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनीही आपल्या गटाची बैठक बोलावलेली आहे दरम्यान राष्ट्रवादी फूट पडून राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्यामुळे आता काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे मंगळवारी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या पक्षाची एक बैठक होणार आहे याच बैठकीत विरोधी पक्ष नेत्याची घोषणा होणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पक्षाची एक बैठक बोलावली आहे या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे

error: Content is protected !!