ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो लावण्यास मनाई

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये सामील झाले आहे. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या कार्यालयात उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर दार तोडून प्रवेश केला आहे.मात्र अजित पवार गटाला आपला फोटो लावण्यास शरद पवारांनी मनाई केली आहे
आज राष्ट्रावादी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी ‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये,’ असं शरद पवार बजावलं आहे.

error: Content is protected !!