ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका अधिकाऱ्याला मारहाणअनिल परब याना अटकपूर्व जमीन मंजूर

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना अखेर वाकोला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि अन्य सहा जणांनी याप्रकरणी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारत मुंबई सत्र न्यायालयातीस विशेष कोर्टानं प्रत्येकी १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा जामीन देतान सर्व आरोपींना तपासांत मुंबई पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह स्नेहा साटम, दीपक गुटकर, दिनेश कुबल, संदीप शिवलकर, चंद्रशेखर वाईंगणकर आणि हरी शास्त्री यांनाही कोर्टानं दिलासा दिला आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असलेल्या सदानंद परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनाही मुंबई सत्र न्यायालयानं मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. या चौघांना २७ जून रोजी याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर मंगळवारी संध्याकाळी सुनावणी पार पडली

error: Content is protected !!