ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन — राज्यपाल दौरा वादाच्या भोवऱ्यात


मुंबई/ राज्यपाल भगतसिंह कोषरि हे आजपासून मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौरा वर जात असून त्यांच्या या दौरायाला महाविकास आघाडीतील नेत्याचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते या दौरयात राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार आहेत .त्यामुळे राज्यपालांचा हा दौरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे

राज्यपाल आणि सरकार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले असून आता राज्यपालांच्या दौरावरुण राजकारण तापले आहे.अतिवृष्टी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी कोकणचा दौरा केला होता त्यामुळे राज्यपालांनी सुधा कोकणचा दौरा केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यानंतर आता राज्यपाल मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौरावर आज पासून जात आहेत. नांदेड मध्ये ते विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेतील तसेच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या बरोबरच आढावा बैठक घेतील .त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातही ते आढावा बैठक घेतील आणि परभणी मध्ये विद्यपीठाचा कार्यक्रमाला हजेरी लावतील .असा एकंदरीत राज्यपालांचा तीन दिवसांचा दौरा आहे .मात्र या दौरावर महाविकास आघाडी नाराज आहे. नवाब मलिक यांनी तर राज्यपालांवर दोन सत्ताकेंद्र बनवत असल्याचा आरोप केला होता .सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की राज्यपाल सरकारच्या कामात पाय अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे कधीतरी ते स्वतःच पाय अडकून पडतील असेही राऊत म्हणाले.
दरम्यान राज्यपाल यांनी मात्र सरकारच्या टीकेला कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र दौरा संपवून आल्यावर ते निश्चितपणे काहीतरी बोलतील किंनवा अँक्शन घेतील अशी चर्चा आहे
बॉक्स/ महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर
आजपासून सुरू होणाऱ्या राज्यपालांच्या मराठवाडा दौरायात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नांदेड,हिंगोली आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी नजर ठेवलेली आहे
.

error: Content is protected !!