महागाईच्या विरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
मुंबई/ सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात ई डी कडून सुरू असलेल्या कारवाई मुळे काँग्रेस संतप्त झाली आहे.त्यामुळे आता काँग्रेसने महागाईच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेस या प्रश्नावर राज्य व्यापी आंदोलन करणार असून शुक्रवारी राजभवनाला घेराव घालणार आहेत
काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे जीवनावश्यक वस्तूंवर सुधा जी एस टी लाऊन देशातील जनतेला देशोधडीला लावले जात जात आहे तसेच बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणांचे भवितव्य अंधारात आहे.महागाई बेरोजगारी आणि ढसाळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत पेट्रोल,डिझेल,सि एन जी आणि घरगुती गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे दूध दही आटा तेल तूप यावरही जी एस टी लावण्यात आला आहे या सर्वांच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करणार आहे तसेच राज भवनाला घेराव घालणार आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनामुळे मुंबई सह राज्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे