ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे बेमुदत आंदोलन


पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलिन करा, बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत सुरु करा, प्रत्येक बस मार्गावर बसगाड्यांची संख्या वाढवून बसफेऱ्या वाढवा, नादुरुस्त बसगाड्या दुरुस्ती केल्याशिवाय मार्गस्थ करणे बंद करा, मुंबईसाठी बेस्टचा मालकीचा ताफा दुप्पट म्हणजेच किमान ६,००० बसेसचा करा आदी मागण्यासाठी कंत्राटी कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आता बेस्टच्या आगारांमधील कंत्राटी कामगारांचा पाठिंबा मिळू लागला आहे. आझाद मैदानात त्यांनी बेमुदत आंदोलन केले आहे
शिवसेना (शिंदे गट) नेते किरण पावसकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्या करून प्रश्न सोडवितो. असे आश्वासन त्यांनी दिले आहे. भाजपा कामगार संघाचे मुंबईचे समन्वयक आणि बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांनीही आंदोलनाला भेट दिली.
बेस्ट प्रशासन, खासगी कंत्राटदारांचे मालक तसेच शासनासोबत याविषयी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मुंबईचे उपनगराचे पालक मंत्री मगल प्रभात लोढा यांची भेट घेण्याचे आश्वासन गणाचार्य यांनी दिले आहे. मनसेचे पदाधिकारी आंदोलकांना भेटून गेल
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राटी कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे तब्बल एक हजारहून अधिक बसेस विविध बस आगारातून बाहेर न पडल्याने बेस्ट प्रवाशांचे मेगा हाल झाले. दरम्यान, संपकरी कंत्राटी कामगारांच्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. बेस्टचे कामगार बस चालवित आहेत. मात्र अपूया बस रस्त्यावर आहेत.

error: Content is protected !!