कंगना राणावत चा चेहरा पाहिला तरी पाप लागेल – शंकराचार्यांचे धक्कादायक विधान
मुंबई/मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांची तारीफ करणाऱ्या ज्योतिर मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अभिनेत्री कंगना राणावत तिच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे .ते म्हणाले की हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभेच्या भाजपा खासदार कंगना राणावत यांचा चेहरा पाहणे ही माझ्यासाठी पाप आहे कारण कंगनाने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत .ते पुढे म्हणाले कंगना राणावत वरील गो मास खाण्याच्या आरोपावर मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की कंगना राणावत हिने २४ मे २०१९मध्ये तिच्या एका ट्विटमध्ये गो मांस खाण्याचे समर्थन केले होते त्यानंतर बराच गदा रोळ झाला होता कंगणावर गोमाऊस खाल्ल्याचा आरोपी होऊ लागला होता. कंगना राणावतने केलेल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की गोमाऊस किंवा इतर कोणतेही मांस खाण्यात काहीही गैर नाही. हे धर्माबद्दल नाही . आठ वर्षांपूर्वी शाकाहारी बनून योगी बनण्याचा निर्णय घेतला हे गुपित नाही. आजही ती फक्त एका धर्मावर विश्वास ठेवत ठेवत नाही तिचा भाऊ मास खातो कांगणाच्या त्या वक्तव्यावर एफ आय आर नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती ही याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळली होती. असेही स्वामींनी म्हटले आहे त्यामुळे आणखी एका वादाला तोंड फुटणार आहे