ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले- देवेंद्र फडणवीस यांच्या टिके मुळे शिवसेना संतप्त

*
मुंबई/मी ढेकणाच्या नादाला लागत नाही कारण ढेकणाला बोटानी चिरडलं जातं तुझ्या नादाला लागला एवढ्या कोटीचा तू नाहीस अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस वर टीका केली होती .त्या टिकेचा समाचार घेताना आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्ला केला ते म्हणाले उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले याचा आम्हाला खूप दुःख झालं कुठल्या जातीचं लागून चालन आम्हाला जमत नाही. विशिष्ट समाजाचे लागून चालन करून आम्ही मते घेत नाही हा एक प्रयोग आहे तो कर्नाटकात झाला त्यामुळे आम्ही गाफील राहिलो की खिंडीत गाठता येत असा त्यांचा समज झालाय पण यावेळी आम्ही गाफील राहणार नाही असेही फडणवीस म्हणाले ते पुढे म्हणाले लोकसभेच्या पराभवाने कार्यकर्त्यांमध्ये नीराशा आहे. संपूर्ण देशांनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मान दिला आहे पंडित नेहरू नंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पण महाराष्ट्रात अधिक कमी पडलो याची खंत कायम मनात राहील. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत आपली तीन पक्षांबरोबर नाही तर चार पक्षांबरोबर लढाई आहे हा चौथा पक्ष म्हणजे खोटा निगेटिव्ह आहे आणि या डिरेक्ट विरोधात आपल्याला सामना करायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असा आदेश फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला

error: Content is protected !!