अपुर्णतेतील पुर्णता !
सर डॉन ब्रॅडमन, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि पॅरिसची परी मनू भाकर यांच्यात एक साम्य आहे. तिघांनीही आपल्या कौशल्याने खेळात इतिहास घडविला. नवनवे विक्रम रचले. आणि या तिघांच्या आयुष्याच्या एका वळणावर सगळे जग जिंकल्यांनंतरही एक अपुर्णता कायम हृदयात सलत राहीली. अर्थात त्या अपुर्णतेनेही या तिघांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून दिलाय.
पॅरिसपासून अडीचशे किलोमीटर दूर शातरू शुटींग रेंजवर मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन मेडल जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याच्या अवघ्या समीप होती. स्पर्धेतील शेवटच्या पाच मिनिटात ती अक्षरशा रौप्यपदाकाला स्पर्श करून आली. पण एक नेम चुकला आणि आयुष्यभराची एक सल पदरी पडली. तो नेम जर अचूक लागला असता तर तीचे पॅरिस ऑलिम्पिकमधिल पदक नक्की होते. तो शेवटचा नेम चुकला आणि चौथ्यानंबरवरील हंगेरीच्या व्हेरोनिकासोबत गुण बरोबरीत झाल्यामुळे शुटआऊट करावे लागले. तिथेही तीला पराभव पत्करावा लागला. आणि चौथ्या क्रमांकावर तीला समाधान मानावे लागले. शुटआऊटचा शेवटचा नेम साधल्यानंतर तीच्या चेहऱ्यावरची क्लांत भावमुद्रा आयुष्यात न विसरता येणारी. कर्म करीत रहा फळाची अपेक्षा धरू नका असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्जुनाच्य चेहऱ्यावर जे भाव असतील ते तिच्या चेहऱ्यावर मी अनुभवले. मेडल जिंकले तेव्हा विजयाचा उन्माद नव्हता आणि आज थोडक्यात पराभव हुकल्यानंतरही निराशा नव्हती. होता तो क्लांत भाव. मी माझ्यातील सर्वस्व दिल्याची भावना त्या मुद्रेत होती. श्रीकृष्णाची गीता एव्हाना मनूच्या आयुष्याची अविभाज्य भाग बनलीय. तिच्यातील प्रग्लभपणा थक्क करणारा आहे. याच मनुला जेव्हा मी टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भेटलो होतो तेव्हा ती अवखळ होती. अनेक चुका झाल्या. कोच जसपाल राणासोबत झालेला तीचा वाद त्यावेळी खुप गाजला होता. गेल्या चार वर्षात ‘गीते’ने तीचे आयुष्य पुर्णत: पालटून टाकले. जसपाल राणा पुन्हा तिच्या पाठीशी
संदीप चव्हाण