ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

भिवंडीत बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत उभारणाऱ्या बाप-लेकाला बेड्या; तर मुख्य आरोपी फरार..

 भिवंडी दि 3 (आकाश गायकवाड ) भिवंडी महानगरपालिकेची बनावट बांधकाम परवानगीसह  असेसमेंट नोटीस आणि मूळ जमीन मालक यांचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून इमारतीमधील  २४ दुकाने आणि ३४ सदनिकांची मूळ मालकांना अंधार ठेवून ५ कोटी रूपयांत विक्री करणाऱ्या बाप – लेकाच्या जोडीला शांतीनगर पोलिसांनी दीड वर्षानंतर अटक केली आहे. किशोर रतिलाल सूचक , कुणाल सूचक अशी अटक केलेल्या बाप-लेकांची नावे तर भरत सूचक हा मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. भरत सूचक हा भिवंडीतील नजराणा कंपाऊंड  परिसरात राहणार आहेत. तर अटक  आरोपी बाप – लेक  ठाण्यात राहतात. 

इद्रिस अब्दुल हमीद शेख (४०, ) यांची वडिलोपार्जित जमीन भिवंडीतील टेमघर- पाईपलाईन भागात मुख्य रस्त्यावर आहे. हि जमीन इद्रिसच्या  वडिलांनी बांधकाम विकासक भरत सूचक यास  भागीदारी करार करून दिली होती.  मात्र इमारत उभारतांना २००१ साली मूळ मालकाला डावलून बांधकाम सुरु केले.  तसेच पूर्वीच्या चाळीतील भाडेकरूंनाही डावल्याने १३ नोव्हेंबर २००१ रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. तरीही मुख्य आरोपी भरत सूचक आणि दोघा आरोपी  बाप लेकांनी  आपसात संगनमत करून  मूळ जमीन मालकांच्या नावाने बनावट कुलमुख्यतर पत्र,  साठेकरार करून त्यावर बनावट सह्या केल्याचे निष्पन्न झाले होते. या दरम्यान आरोपींनी दोन मजली आणि त्यांनतर आणखी एक मजला अशी तीन मजली इमारत पालिकेची बनावट परवानगी व इतर इतर कागदपत्र तयार करून उभारली आहे. यामुळे जमीन मालक इद्रिस यांनी २००९ साली लोकआयुक्तकडे धाव घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत लेखी पुरावे सादर केले. यावर सुनावणी होऊन इमारत उभारताना बनावट कागदपत्रे सादर केल्याने सदरची गुरुदेव निवास इमारती जमीनदोस्त करावी म्हणून पालिकेला निर्देश दिले. मात्र या विरोधात आरोपींनी न्यायालयात धाव घेतली. अखेर  27 जून 2019 रोजी शांतीनगर पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला.  यामुळे आरोपींनी अंतरिम जामीनसाठी  अर्ज केला. मात्र 8 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा सत्र न्यायालय ठाणे यांनी  आरोपीचा  अंतरिम जामीन रद्द केला होता.  तरी देखील या गुन्ह्यातील आरोपींना  अटक करण्यासाठी तक्रादार इद्रिस यांनी वारंवार  वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे  तक्रार दिल्या होत्या. अखेर दीड वर्षांनी  या गुन्ह्यातील २ आरोपीना  शांतीनगर पोलिसांनी  अटक केली आहे. तर मुख्य आरोपी भरत सूचक हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

error: Content is protected !!