ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

बोरिवलीतील गांजवला रेसिडेन्सी इमारतीला भीषण आग


मुंबई/बोरिवली (प) येथील गांजावाला .लेन मध्ये असलेल्या गांजावला रेसिडेन्सी या इमारतीला काल सकाळी आज लागून त्यात इमारतीचा सातवा मजला जाळून खाक झाला असून आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवानही जखमी झाला आहे .
गांजवाला इमारीला आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोचल्या व त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले तसेच या इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाश्यांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले ही आग सातव्या मजल्यावर लागली होती आगीत सातवा मजला जाळून खाक झाला तर आग विझवताणा अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरू असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्रार्थमिक अंदाज आहे .

error: Content is protected !!