ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

राजिप व पं.स. निवडणुकीची कर्जत मतदार संघात जोरदार तयारी सुरु; ठिकठिकाणी शिवसेनेचा बैठकांचे आयोजन!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुका काही महीन्यांवर येवुन ठेपली आहे. त्यामुळे आता कर्जत विधानसभा मतदार संघातील सर्वच प्रभागांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी ठिकठिकाणी पक्षांचा बैठका घेणेवर जोर दिला आहे. सध्या प्रभागनिहाय बैठका कर्जत मतदार संघात सुरु असल्याने रायगड जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार असल्साचा विश्वास शिवसैनिकांमधुन व्यक्त केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांचा विकासकामांची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. कोरोना संकट काळातही शेकडो करोड रुपयांची विकासकामे कर्जत मतदार संघात आमदारांचा प्रयत्नाने झाली आहेत. तसेच विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. अनेक दुर्गम भागात प्रंचड विकास कामांची गंगा आमदार थारवे यांचा प्रयत्नातून वाहताना दिसुन येते. त्यामुळे कर्जत मतदार संघात शिवसेनेकडे जनतेचा कौल अधिक आहे. आमदारांचा विकास कामांवर प्रभावीत होवुन अनेक जण ईतर पक्षांतुन सेनेमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आमदार महेंद्रशेठ थारवे यांचे नेत्रुत्वाखाली कर्जत मतदार संघात शिवसेना प्रंचड वाढतानाचे
चित्र दिसुन येत आहे.
विशेष म्हणजे सध्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आमदार सेनेचे असल्याने रायगड जिल्हा परिषदेवर सेनेचा झेंडा फडकविण्यासाठी या तीनही आमदारांचेही जोरदार प्रयत्न सुरु झाले आसल्याचे राजकीय दुनियेत बोलले जाते. कर्जतचे आमदार तर जिल्हा परीषद व पंचायत समितीचा निवडणुकीचा जोरदार तयारीला लागले आसल्याचे त्यांचे कार्यकर्त्यांकडुन सांगणेत येत आहे. तसेच आमदार थोरवे यांचा नेत्रुत्वाखाली सध्या कर्जत मतदार संघात ठिकठिकाणी पक्षाचा आढावा बैठकींना सुरुवातही झाली आहे. प्रत्येक बैठक कोरोना नियम पालुन होत असल्याचे दिसत असुन येथे मोठी गर्दी शिवसैनिकांची दिसुन येते. त्यामुळे येवु घातलेल्या राजिप व पंचायत समिती निवडणुकीत सेना तयारीत आघाडीवर असल्साचे बोलले जात आहे. शिनेसेनेचे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे व खालापुर तालका प्रमुख तसेच
युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांसह महीला पदाधिकारीही या प्रभाग निहाय बैठकांचे ठिकठिकाणी आयोजन करीत आहेत.
दरम्यान कर्जत मतदार संघातील राजिप व पंचायत समितीचा सर्वच्या सर्व जागा मिळविणार असल्याचा दावा कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे हे करीत आहेत. तसेच कर्जतमधे आमदार थोरवे यांनी प्रचंड विकासकामे केली असल्याने आमदारांना येथे जनतेतुन वाढता पाठींबा मिळत आहे. या विकास कामांचा मोठा फायदा अनेक प्रभागात सेनेला होणार असल्याने येवु घातलेल्या राजिप व पंचायत समिती निवडणुकीत सेनेचे मोठे आवाहन विरोधी पक्षांसमोर असणार आहे. तसेच राष्ट्रवादीचाही प्रभाग निहाय बैठका सुरु आहेत. त्यामुळे कर्जत मतदार संघात सेना विरुद्ध राष्ट्रवादी लढत होते की महाविकास आघाडी होते? याबाबत आता उलटसुलट चर्चा मतदार संघासह रायगडात सुरु आहेत. त्यामुळे येवु घातलेल्या राजिप व पंचायत समिती निवडणुकांची कर्जत विधानसभा मतदार संघात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी जोरदार तयारी सुरु केली असल्याने, इतर पक्षही आता तयारीला लागल्याचे दिसत
आहे. मात्र मतदार संघात दोन वर्षापुर्वी पासुन सुरु असलेली विकास कामांचा जोरावर येथे सेना राजिप निवडणुकीत जोशात असण्याचे मत राजकीय तज्ञ वर्तवित आहेत.

error: Content is protected !!