ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील 16 हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करणार आहेत त्यामुळे 40/५० वर्षांच्या जुन्या भाडेकरूंना इमारतीचा मालक यापुढे घबरवू शकणार नाही कारण बाप दाखव नायतर श्राद्ध कर या म्हणी नुसार जर मालक इमारतीचा पुनर्विकास करायला तयार नसेल तर त्याला बाजूला सारून तिथले रहिवाशी आता इमारतीचा विकास करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक चाळ मालकांचे धाबे दणाणले आहेत .

error: Content is protected !!