एसटी कामगारांच्या संपाबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई – एन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी संप पुकारल्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज उद्योगमंत्री उदय आतयांच्याशी कर्मचारी प्रतिनिधींची बैठक झाली पण ती निष्फळ ठरली त्यामुळे हा संप सुरूच रहाणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांशी बैठक आहे
राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी उद्या (दि. ४) सह्यादी अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ४८ तास थांबायला हवे होते. गणेशोत्सवात संप करणे योग्य नाही. त्यामुळे गणेश भक्तांसाठी संप आज मागे घ्यायला हवा होता, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते आज (दि. ३) पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्य़ा विविध मागण्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. संपाबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. नव्या एसटी गाड्यांबाबत बैठकीत चर्चा झाली. गणेश भक्तांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. त्याचबरोबर संपाला पाठिंबा दिलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
बुधवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची बैठक होणार आहे. यावेळी विविध मागण्य़ांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.