ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

रायगड मधून आठ महिन्यात 250 महिला , मुली बेपत्ता – धक्कादायक-मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता

रायगड जिल्ह्यात गत काही महिन्यापासून 18 वर्षाखालील मुलीं बरोबर विवाहित बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे . जिल्ह्यात आठ महिन्यात 250 जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे त्यामध्ये 156 महिलांचा समावेश आहे . मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे .वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळविण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याने पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे .

बलात्काराच्या प्रकरणात महिलांच्या ओळखी चे कुणी आरोपी असण्याचे प्रमाण वाढले आहे . घरगुती वादामुळे कंटाळून घर सोडले आणि प्रियकरासोबत पळून जाण्याचे वाढत्या घटनांमुळे महिला हरविण्याची प्रमाण वाढले . आश्चर्याची बाब म्हणजे राग शांत झाल्यावर महिला घरी परतण्याचे प्रमाण आहे .

पोलिसांनी गांभीर्याने पाहण्याची गरज

पोलिस ठाण्यात येणाऱ्या मिसिंग तक्रारीकडे गांभीर्याने पाहण्याचे प्रमाण कमी झाले आहे . त्यात बायको मिसिंग तक्रारी घेऊन येणाऱ्या व्यक्तीवर प्रश्नाचा भडिमार करून त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते . मात्र महिला मिसिंग मध्ये काही समस्या चा प्रकार आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते . त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे समोर येत आहे

error: Content is protected !!