ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शरद पवारांचा दोन्ही गटांना सल्ला!- दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा


मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील सध्याची तणावाची स्थिती पाहता दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यात जर भडकाऊ भाषणे झाली तर त्याच्या प्रतिक्रिया समर्थकांमध्ये उमटतील आणि त्यातून मोठा राडा होऊ शकतो .परिणामी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते म्हणूनच दसरा मेळाव्यात मर्यादा सांभाळा असा वडीलकी चां सल्ला शरद पवार यांनी दोन्ही गटांना दिला आहे
शिवसेनेत मोठी फूट पडून 40 आमदार वेगळे झाले आणि त्यांनी भाजपा सोबत जाऊन सरकार स्थापन केले आता शिंदे गट थेट शिवसेनेवर आपला हक्क सांगत आहे त्यानुसार शिवसेनेचे चिन्ह आणि दसरा मेळावा सुधा हायजक करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न होता पण शिवसेना न्यायालयात गेली .त्यामुळे शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळू शकले नाही. परिणामी त्यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार आहे या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत.शिवसेनेतील फुटी नंतर मुंबईत आणि मुंबई बाहेर सुधा काही ठिकाणी दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत येणाऱ्या दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार घडू शकतो हे लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही घटना मर्यादा सांभाळा असा सल्ला दिला आहे .

error: Content is protected !!