ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

धर्माची ठेकेदारी


भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे पण 2014 नंतर इथली परिस्थिती बदलत चालली आहे देशात धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे एकीकडे जिहादी मुसलमान तर दुसरीकडे कट्टरपंथी हिंदुत्ववादी या दोघांमध्ये शांततेने जीवन जगणाऱ्या इतर धर्मियांचे जगणे मुश्कील झाले आहे त्यामुळं हिंदू आणि मुस्लिम धर्मातील कट्टरपंथी लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी निर्णायक पण कायद्याच्या चौकटीत राहून यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे या देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे याचा अर्थ असा नाही की एका धर्मातील लोकांनी दुसऱ्या धर्मातील लोकांचे जीने हराम करावे आज हा देश एकसंघ ठेवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी हिंदूंनी मुस्लिमांच्या आणि मुस्लिमांनी हिंदूंच्या सुख दुखत सनावारा त मिसळून धार्मिक सलोखा राखणे गरजेचे आहे पण नवरात्रोत्सवात काही ठिकाणी मुस्लिमांना मज्जाव करण्यात आला एका ठिकाणी तर दांडिया रास खेळण्यासाठी गेलेल्या मुस्लिम तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये मशिदी आणि दर्गे आहेत आणि आमचे काही हिंदू बांधव कधी कधी त्यांच्या मुलाबाळांना बरे नसले की त्यांना दर्ग्यात घेऊन जातात त्यावेळी तिथले जे कुणी झाड फुक करणारे मौलवी त्यांच्याकडे गेलेल्या हिंदूंना तेथून हाकलून देत नाहीत उलट त्यांची चांगली विचारपूस करतात तसेच एखादा मुस्लिम इसम भक्ती भावाने आपल्या मुलाबाळांना चांगली सुख समृध्दी लाभावी म्हणून भक्ती भावाने मंदिरात जातो नवस बोलतो मात्र त्याला मंदिरातील पुजारी कधीच विरोध करीत नाही कित्येक मुस्लिम दीड दिवसांचा गणपती घरी आणतात.पण कुठेही हिंदूंनी त्यांना विरोध केलेला नाही दोन्ही समाजातील समजूतदार लोकांमधे ही धर्म सहिष्णुता आहे.पण दोन्ही कडचे काही मूठभर लोक जातीयवाद उकरून कडतात आणि दोन समाजात तेढ निर्माण करतात वास्तविक कुठल्याही धर्मात देवाच्या दरबारात कधीच भेदभाव नसतो देवाच्या दरबारात सर्व सारखे असतात पण काही धर्म मर्तंडणी चक्क देवालाही फसवले आहे आणि देवाच्या चांगल्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावून भेदभाव निर्माण केले आहेत.

error: Content is protected !!