ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रराजकीय

शिवसेना- शिंदे गट आमने सामने- दसरा मेळाव्यात राडा होण्याची शक्यता

मुंबई/ महाराष्ट्र समोर समस्यांचे डोंगर उभे असताना इथल्या राज्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करूंन मुंबईकरांचे टेन्शन वाढवण्याची अवदसा आठवली.शिवसेनेचे सोडा त्यांचा दरवर्षी दसरा मेळावा होतो पण शिंदे गटाचे काय? तुम्ही सत्ते मध्ये आहात तेंव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची होती . पण शिवसेनेच्या विरोधात गेलेल्या लोकांना मुंबईत आणून वातावरण तापवणे .मुंबईच्या शांततेला डिस्टर्ब करणे पोलिसांवरच ताण वाढवणे या गोष्टी मुख्यमंत्र्यांना शोभतात का असा संतप्त सवाल मुंबईकर विचारीत आहेत .
शिंदे गटाने जेवढा खर्च मेळाव्यासाठी केलाय तेवढ्या खर्चात गरीब शेतकऱ्यांच्या घरातील महिनाभर. चुली पेटल्या असत्या आज मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सुधा लाखो शिसैनिक संपूर्ण मुंबईत येणार आहेत .त्यांच्या मनात फुटीर लोकांच्या विषयी चीड आहे तर दसऱ्या सारख्या पवित्र सणाच्या दिवशी मुंबईतील वातावरण खराब करणे योग्य नाही असे मुंबईकर म्हणत आहेत .

error: Content is protected !!