ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या लढ्याला मोठे यश मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा


नवी दिल्ली/मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या महाराष्ट्रातला अखेर आज यश मिळाले केंद्र सरकारने आज मराठी सह अन्य चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे आता देशातील साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाऊ शकते त्याचबरोबर मराठी भाषेचा विकास आणि जागतिक विस्ताराला चालना मिळू शकते
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या सरकारने आवाज उठवला केंद्राला आवश्यक ते पुरावे दिले केंद्राच्या निकषानुसार अभिजात भाषासाठी दीड ते वर्षांपूर्वीची ती भाषा असावी लागते त्याबाबतचे सर्व पुरावे महाराष्ट्राने केंद्राला दिले होते अखेर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेसह पाली प्रकृत आणि बंगाली व आसाम भाषा नाही अभिजात भाषेचा दर्जा घेण्यात आला आहे त्यामुळे आता मराठी भाषा साता समुद्रापलीकडे विस्तारली जाऊ शकते तसेच देशातल्या साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन होऊ शकते मराठी भाषा डिजिटल होऊन इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये मराठी भाषेच्या कथा कादंबऱ्या आणि इतर साहित्याची डिजिटललयजेशन होऊ शकते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले आहे

error: Content is protected !!