ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

माता न तू वैरीनी!


जगाने आज विज्ञानाच्या जोरावर किती मोठी प्रगती केलीय हे समोर दिसत असतानाही भारतीय लोक मात्र अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या विकारांच्या चिखलात अडकलेले आहेत आणि त्यातून बाहेर येण्याची त्यांना अजिबात आवश्यकता वाटत नाही .म्हणूनच ते जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसलेले आहेत.भारतात बेटी बचाव बेटी पढाव सरकारकडून राबवले जातेय आणि त्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी यात फरक करू नका असा संदेश पोचवलं जातोय तरी सुधा लोकांना मुली नकोशा झाल्यात .प्रत्येकाला वंशाचा दिवा हवा असतो.पण हा वंशाचा दिवा कधी कधी कुऱ्हाडीचा दांडा बनून गोतास काळं ठरतो हे ठाऊक असूनही लोकांना मुलगाच हवा असतो आणि याच घाणेरड्याया मानसिकते मधून काही लोक पोटच्या पोरीचा बाळी घेतात.बापाचं एक वेळ समजू शकत त्याची पुरुषी मानसिकता असते .पण आईचे काय? ९ महिने उदरात बाळगलेल्या मुलीला आई कस काय मारू शकते? मात्र मुंबई सारख्या शहरात अशा घटना घडत आहेत अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलामुलींना तर कचऱ्याच्या पेटीत फेकले जातेच पण मुलाचा हव्यास असलेल्या काही कैदशिनी पोटच्या मुलीलाही निर्दयपणे मारून टाकतात काळाचौकी येथे अशाच एका घटनेत पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरीही मुलगी झाली म्हणून तिला मारून टाकले आणि आपल्या मुलीच्या अपहरणाची खोटी फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदवली.केवढे हे स्त्रीचे हृदय खूप कोमल अस्त .त्यात प्रेम,माया,वात्सल्य आदी गोष्टी ठासून भरलेल्या असतात असे सांगितले जाते पण काळाचौकी येथील घटनेने हे सगळ खोत ठरवल आहे.एक आई आपल्या ८ महिन्याच्या बालिकेला पाण्याच्या टाकीत बुडवून मरते हा प्रकारच अंगावर काटा आणणारा आणि कुठल्याही माणसाचे हृदय हेलावून टाकणारा आहे त्यामुळे अशा बाईला अत्यंत कठोर शिक्षा व्हायला हवी एक महिला म्हणून तिला कुणाचीही सहानुभूती मिळता नये कारण अशा महिला ज्या आपल्या पोटच्या पोरीला ठार मारू शकतात त्यांच्यासाठी दुसऱ्याची मुले काय ? अशा बायका कुणाच्याही लेकरा बालांचा तितक्याच निर्दयपणे जीव घेऊ शकतात त्यामुळे अशा बाईच्या हातून घडलेल्या गुन्हा हा सहानुभूती किंवा दयेच्या लायक नाही.या बाईला फासावर लटकवायला हवे तीच तिच्यासाठी योग्य शिक्षा ठरेल .आजकाल मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीच फरक नाही उलट आजची स्त्री ही समाजात पुरुषाच्या बरोबरीने त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. एक वेळ मुलगा आई वडिलांना वाऱ्यावर सोडू शकतो पण मुलगी नाही उतार वयात कित्येक मुली त्यांच्या आई वडिलांचा म्हातारपणीचा आधार बनल्यात.आणि आई वडिलांचा चांगला सांभाळ करीत आहेत.काही मुलींनी तर आपल्या आई वडिलांसाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडले आणि अविवाहित राहून आई वडिलांची सेवा करीत आहेत तर मुलाचे लग्न झाले की मग तो बायकोच्या नादाने आई वडिलांना त्रास देतो आई वडिलांची त्याला संसारात अडचण वाटू लागते आणि म्हणूनच तो आई वडिलांना वृद्ध आश्रमात टाकतो .जिने आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला ती केवळ मुलगी म्हणून जन्माला आल्याने मारून टाकले तिला आणि तिच्या सारख्या बुरसटलेल्या महिलांना मुलगा आणि मुलगी यातला हाच फरक दाखवून देण्याची गरज आहे

error: Content is protected !!