मुंबई ( कुर्लात) सामूहिक बलात्कार
मुंबई – राजधानी मुंबई आता खरोखरच महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही . कारण शक्ती मिल आणि साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने महिलांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली आहे
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्येही अशा घटनांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. तीन व्यक्तींनी एका महिलेच्या घरात घुसून सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ माजली आहे. या नराधमांनी बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटने चटके दिले. या सर्व घटनेचा व्हिडीओही काढला. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील कुर्ला येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मुंबईतील कुर्ला येथे बुधवारी 42 वर्षीय महिलेवर तीन व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी त्या महिलेवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटनं चटके दिले. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने रविवारी या धक्कादायक घटनेबाबतची माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी कुर्ल्यामध्ये ही घटना घडली. आरोपी आणि महिला कुर्ल्यातील एकाच परिसरात राहतात. आरोपींनी महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. पीडित महिलेसोबत या नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार देखील केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.