ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न – देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शिंदेंची भेट

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या दिल्लीत तिन्ही पक्षांची २८ नोव्हेंबरला बैठक झाल्यापासून शिंदे नाराज होते ते आजारी आल्याचे सांगितले जात होते. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर शिंदेंची भेट घेतली
विधानसभेच्निया वडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, हे सर्व सुरु असताना विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. यातच महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर गृहमंत्री पद सोडण्यास भाजपा तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.
पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील पार पडली होती. मात्र, या बैठकीनंतरही महायुतीमधील तिढा सुटला नाही अशी चर्चा आहे. यातच एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहेत. तसेच त्यांनी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

error: Content is protected !!