फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्ला – महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर होती, त्यामुळं त्यांच्यावर दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना हे दोन्ही एफआयआर नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र नंतर या प्रकरणात त्यांना कलींचीट मिळाली