ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

दहा तारखेला राणी बाग पर्यटकांसाठी खुली होणार

मुंबई/ कोरोनच प्रादुर्भाव संपात आल्याने आता मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे आणि म्हणूनच मुंबईची ओळख असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बाग १० तारखेपासून खुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे
मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. कोरोनामुळे ती बंद केली होती. मात्र आता १० फेब्रुवारीपासून राणीची बाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली होणार आहे. तसा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी बागेच्या तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!