ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी फटकावले

पुणे/ शिवसेना आणि महाविकस आघाडीवर सतत वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले
सोमय्या यांनी पुण्यातील कॉविड सेंटरमधील घोटाळ्याची पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानंतर ते पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी पुणे महापालिकेकडे निघाले होते यावेळी शिवसैनिक त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी ते स्वीकारले नाही त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या जोरदार धक्काबुक्की केली यावेली सोमय्या त्यांचे अंगरक्षक बाहेर घेऊन जात असतां ते पायरीवरून घासरून खाली पडले यात त्यांचा हात फकचर झाला आहे त्यांना पुण्याच्या संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठण्याबाहेर आंदोलन केले त्यामुळे आता सेना भाजपतील वाद आणखी वाढला आहे.

error: Content is protected !!