ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर मध्ये आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार

डॉक्टर नसल्याने मुलीची प्रसूती करण्याची आईवर पाळी
त्र्यंबकेश्वर – आरोग्य विभागाचाभोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने एका महिलेलाच तिच्या मुलीची प्रसूती करावी लागल्याने खळबळ माजली आहे

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे जवळील बरड्याचीवाडी येथील एक महिला डिलिव्हरीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने आईलाच मुलीची डिलिव्हरी करावी लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ दहा पंधरा कुटुंबीयांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती कळा जाणवत असल्याने आज सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांच्यासोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी तरी डिलिव्हरी केली. यावेळी या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

error: Content is protected !!