ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू- उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा


खेड – आम्हाला देशद्रोही म्हणण्याचा प्रयत्न कराल तर जीभ हासडून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना दिला आहे

केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेत आहेत. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आम्हाला देशद्रोही म्हटला असता तर जीभ हसडून टाकू, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते खेड येथे जाहीर सभेत बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

“राजन साळवी, अनिल परब हे काय देशद्रोही आहेत का? १९९२-९३ ला जेव्हा मुंबईत सगळं पेटलं होतं. त्यावेळी अनिल परबांसारखे सगळे शिवसैनिक तिकडे होते. ते शिवसैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटत आहेत का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला

error: Content is protected !!