ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

त्यांना धडा शिकवायचा होता त्यासाठीच त्यांचा पक्ष फोडायचा होता ! शेलारांची शिवसेना राष्ट्रवादीच्याफुटी बाबत स्पष्ट कबुली

मुंबई- भाजप नेते आशिष शेलार यांनी मागच्या काही काळापासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीबद्दल थेटपणे भाष्य केलं आहे. आम्हला पक्ष फोडायचा होता, त्यांना धडा शिकवायचा होता.. अशा शब्दात त्यांनी पूर्वाश्रमीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मत मांडलं. एका वृत्त वाहिनीशी ‘माझा व्हिजन’ या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
आशिष शेलार म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करुन राज्यात आणि मुंबईत आमचं नुकसान झालं होतं. तेव्हा आम्हाला विश्वासघातकी मित्र मिळाला, देशाच्या राजकारणात कुणी इतसं विश्वासघातकी असूच शकत नाही. आम्ही सातत्याने त्यांना पचवत गेलो होतो. पण मुंबईकरांची इच्छा आता ठाकरेंविना भाजप आणि ठाकरेंविना मुंबईचा विकास, अशी आहे.
शेलार पुढे म्हणाले की, आम्ही कधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेलो नाही. भाजप आणि सेना यांचंच सरकार आलं पाहिजे या मताचे आम्ही होतो. २०१९ पहाटेचा शपथविधी ही एक रणनीती होती. त्या माध्यमातून शरद पवारांना धक्का देण्याचं, धडा शिकवण्याचं काम आम्ही केलं.
”त्यांना दंडीत करायचं होतं. त्याचं कारण जनतेने आमच्या युतीला मतं दिली होती. त्यानंतर त्यांनी ज्यांना-ज्यांना फोडलं त्यांना आम्ही फोडलं. आम्ही नंतर अजित पवारांच्या पक्षासोबत युती केली. पवारांचा पक्ष फोडायचा होता.. त्यांना धडा शिकवायचा होता” अशा शब्दात आशिष शेलारांनी भूमिका मांडली.

error: Content is protected !!