ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शेलाराना भाजपात कुणीही विचारात नाही – आदित्य ठाकरे


मुंबई: भाजपशी दगाफटका करणाऱ्या पक्षांना दंडित करा, असा आदेश अमित शाह यांनी दिला होता. त्यानुसार आमच्याशी दगाबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आम्ही दंडित केले, असे वक्तव्य करणारे भाजप नेते आशिष शेलार यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. मला आशिष शेलारांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. कारण मला मनापासून त्यांच्याविषयी वाईट वाटते. मी त्यांना सांगितलं की, त्यांना थेरपीची गरज आहे. आशिष शेलारांना पक्षात कोणी भाव देत नाही. त्यांना मंत्रिपद दिलं जात नाही, त्यांचे जॅकेट तयार आहे. त्यामुळे मला आशिष शेलार यांच्याविषयी सहानुभूतीपलीकडे काहीही वाटत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत एबीपी माझा आयोजित ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या उद्योगविषयक धोरणांवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना असूनही महाराष्ट्रात मोठी परकीय गुंतवणूक आली होती. पण भाजपने महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाची राखरांगोळी केली आहे. जे उद्योग आपल्याला नको आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणे अवघड आहे, ते प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत. यामध्ये जैतापूर आणि नाणारसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. तर सेमीकंडक्टर, एअरबस, बल्क ड्रग प्रकल्प यासारखे स्वच्छ आणि मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण करणारे उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत. महाराष्ट्र कसा चालवायचा, हे दिल्लीतून आलेल्या आदेशांवर ठरत आहे. इगो इश्यू म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला पाठवले जात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली..

error: Content is protected !!