जरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती.ही कारवाई योग्य असल्याची मान्यता कोर्टाने दिली आहे. हा कारखाना शेतकर्यांचा ताब्यात द्या, अशा आग्रह भारत सरकार आणि ईडीचा असल्याचे किरीट सोमय्या यांनी आहे. त्याच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांना या प्रतिक्रिया देणार हे आता पाहावे लागणार आहे.
तसेच दरम्यान, मुरुड येतील परिहवन मंत्री अनिल परव यांचे रिसॉर्टवरुन किरीट सोमय्यांनी ट्विट केले असून ‘बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी जमिन विकल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी ट्विटमध्ये केला आहे. त्यात सातबारा त्यांनी जोडला आहे. ही जमीन 62,300 स्केअर फूट इतकी आहे. एनए व्यावसायिक असणारी ही जमिन 10 कोटी जास्त बाजार मुल्याने विकत आहे. एवढेच नव्हे तर वँक ऑफ इंडियाने या जमिनीवर 4.12 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. अशा उल्लेख त्यांनी केला आहे.