जेवणावळी चां निमित्ताने तिन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न
महा विकास आघाडीची आज डिनर डिपॉलमसी
दिल्ली / महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील नाराजाना चुचकरण्यासाठी आज दिल्लीत महाविकस आघाडीच्या नेत्याची एक डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे या डिनर पार्टीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र येणार आहेत
महा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या adij वर्षात काहींना काही कारणावरून मतभेद सुरूच आहेत.त्यातच सरकारच्या कामकाजावर अनेक वेळा काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतभेद होऊन अनेक ठिकाणी आघाडीतील उमेदवार एकमेकांच्या विरोधात लडले होते आणि आता तर विकास निधी वाटपावरून शिवसेना व राष्ट्रवादीत मोठे मतभेद झाले आहेत. सरकार मधील नेत्यांच्या मागे एडी लागलेली असताना आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकोपा असणे आवश्यक आहे म्हणूनच काल दिल्लीत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या आमदार खासदार आणि नेत्या साठी dinarcha कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्याला तिन्ही पक्षांचे आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यात सविस्तर चर्चाही होणार आहे. एकूणच ही डिनर डिप्लोमसी चांगलीच यशस्वी करण्यासाठी तिन्हीं पक्षांनी कांबार कसली आहे स्वतः शरद पवार या डिनर पार्टी मध्ये हजर राहून आमदार खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत