ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

..तर भारतातही श्रीलंके सारखी स्थिती येईल

आशिया खंडातील एक निसर्गरम्य छोटा देश म्हणून श्रीलंकेची जगात ओळख होती पण काही वर्षांपूर्वी एल री टी ई या दहशत वादी संघटनेने केलेल्या खून करण्यामुळे श्रीलंका अशांत झाली होती.अखेर प्रभाकरण यांच्या मृत्यू नंतर श्रीलंकेतील दहशतवाद आटोक्यात आला होता .त्यानंतर देशाची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसलेली असतानाच राजपक्षे यांच्या कुटुंबीयांनी सतेचा दुरुपयोग करून सरकारी खजिन्याची जी लुटमार केली त्यामुळे श्रीलंकेची वाट लागली आज श्रीलंकेत लोकांना दोन वेळचे सोडा एकवेलचे सुधा जेवण नशिबी नाही कारण जीवनावश्यक वस्तूंची प्रंचड टंचाई निर्माण झालेली आहे चहा 100 रुपये तर तांदूळ 500 रुपयांना मिळत आहे . साधे ब्रेडचे पॅकेट 150 रुपयांना विकले जात आहे .सरकारची गंगाजळी संपल्याने जीवनावश्यक वस्तू आयात करायलाही सरकारकडे पैसा नाही.त्यामुळे लोकांवर उपाशी मरायची पाळी आली 12 ते 13 तास वीज गायब झाली .उद्योग धंदे बंद पडले परिणामी चिडलेले लोक रस्त्यावर उतरले आणि श्रीलंकेत हिंसाचाराचा आगडोंब उसळला अखेर सरकारला देशात आणीबाणी लावावी लागली मात्र आणीबाणी असतानाही लोक रस्त्यावर उतरून सरकारच्या विरुद्ध आक्रोश करीत होते .राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते कारण राजपक्षे आणि सतेत असलेल्या त्यांच्या नेतेकानी देश लुटून खाल्ला 2019 पासून ही लुटमार सुरू होते अखेर सरकारी खजिना खाली झाला आणि जनतेचे उपासमारीने हाल होऊ लागले .तेंव्हा श्रीलंकेत राजपक्षे यांच्या विरुद्ध जनतेने उठाव केला.श्रीलंकेतील ही परिस्थिती भारताच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे कारण भारतात सुधा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे .मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा करून परदेशी बँकांकडून कर्ज घेतली जात आहे आणि तो कर्जाचा पैसा नेते लुटत आहेत .

आज देशाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही .जे चित्र दाखवले जात आहे ते खरे नाही करोनाचा दीड वर्षाच्या काळात देशातील उद्योगधंदे बंद पडले लोकांची आर्थिक घडी विस्कटून गेली अजूनही स्थिती सुधारलेली नाही .त्यातच या देशात फालतू गोष्टींवर अनावश्यक खर्च केला जात आहे गरज नसतानाही जपानकडून 1 लाख कोटींचे कर्ज काढून बुलेट ट्रेन सुरु केली जाणार आहे . पुतळे,उद्याने,मंदिरांचे सुशोभीकरण यावर प्रंचड खर्च केला जात आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील गंगाजळी हळू हळू आटत चालली आहे अशा वेळी जर तिसरे महायुद्ध झाले तर त्याचा भरतावर परिणाम होईल निर्यात ठप्प होईल आणि आपल्यावरही जीवनावश्यक वस्तूपासून इतर सर्व आयात करावे लागेल आणि या आयातीत देशाच्या तिजोरीत असलेला सर्व पैसा संपून जाईल आणि मग आपल्याकडेही श्रीलके सारखी स्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही . कोणत्याही देशात जेंव्हा विकासाची गती मंदावते उत्पन्न घतून त्याचा निर्यातीवर परिणाम होतो तेंव्हा देशावर आर्थिक संकट येण्याचा धोका असतो आपल्या देशात एकीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे सरकारी खजिन्याची लुटमार होतेय तर दुसरीकडे जयंत्या पुण्यतिथी संप आंदोलने सणवार यामुळे उद्योगधंदे बंद राहून त्याचा देशाच्या उत्पादनावर परिणाम होतोय .श्रीलंकेत सुधा 2019 पासून अशीच स्थिती होती त्यामुळेच आज श्रीलंकेत आर्थिक संकट निर्माण झाले भारतात सुधा भ्रष्टाचार आणि सरकारी पैशांची फालतू गोष्टींवर होणारी उधळपट्टी थांबली नाही तर भारतातही तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते

error: Content is protected !!