ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

युपी पाठोपाठ महाराष्ट्रातही मोघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळण्याच्या हालचाली सुरु



मुंबई – युपी पाठोपाठ एमसीएआरटी ने आपल्या बारावीच्या पुस्तकातून मोघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही राज्यातील पाठयपुस्तकातून मोघलांचा इतिहास वगळण्याचा विचार करीत असल्याचे संकेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४ तासांच्या आता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अँड ट्रेनिंगनं आपल्या १२वीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास सांगणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं भाजपानंही स्वागत केलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी यासंदर्भात इंडिया टुडेच्या वृत्ताचा एक व्हिडीओ ट्वीट करून त्यावर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. “एनसीईआरटीनं मुघलांचा खोटा इतिहास हटवण्याचा एक चांगला निर्णय घेतला आहे. क्षुल्लक लोकांना मुगल साम्राज्य आणि भारताचे बादशाह म्हटलं जायचं. अकबर, बाबर, शाहजहान, औरंगजेब यासारख्या लोकांची जागा इतिहासाच्या पुस्तकात नाही”, असं कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बारावीच्या पुस्तकातून इतिहास हटवल्यानंतर आता पुढे काय? यासंदर्भात कपिल मिश्रा यांनी अजून एक ट्वीट मंगळवारी केलं आहे. यामध्ये “मुघलांचं असत्य इतिहासातून हटवण्यात येत आहे. आता पुढच्या टप्प्यात त्यांचं सत्य सांगितलं जाईल. मुघलांची लूट, व्याभिचार, अत्याचार, घाबरटपणा, मंदिर-मूर्तींचा द्वेष,, त्यांची , कला-साहित्य-संगीताशी त्यांचं असलेलं शत्रुत्व अशा सर्व गोष्टींबाबतचं सत्य उघड होईल”, असं कपिल मिश्रांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

error: Content is protected !!