नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा – जात प्रमाणपत्र ठरले वैध !
नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे आहे. २०१९ मध्ये अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्यावर त्यांचे २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र रद्द झाले होते. त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उर्वरित काळ त्यांची खासदारकी कायम राहीली. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राचा खटला न्यायालयात प्रलंबित होता कारण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला होता त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने त्याचं जात प्रमाणपत्र वैध ठरवल.
२०१९ च्या निवडणुकीत . नवनीत राणा या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सेना -भाजप युतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आल्या. पण निवडून येताच त्यांनी केंद्रात मोदींना समर्थन दिले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले होते. त्यांची भाजपशी जवळिक वाढली होती. २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र रद्द होऊनही त्यांचे लोकसभा सदस्यत्व अबाधित राहिले. आणि आता तर सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना अभय दिले त्यामुळे लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.