सत्तेसाठी एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्यांमध्ये रस्सीखेच होणार
मुंबई/राजकारणात कोणीही दांडगाई करू नये ,दांडगाई करणाऱ्यांची काय अवस्था होते ते लोकसभा निकालाच्या दिवशी दिसून आले देशात लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीत निकाल लागला या निवडणुकीत 400 च्या वल्गना करणाऱ्या भाजपला तीनशे जागाही मिळाल्या नाहीत भाजप आघाडीला देशभरात 294 जागा मिळाल्या तर भाजपला 242 याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने झेप घेत 234 जागा पटकावले आहेत त्यामुळे सत्तेसाठी इंडिया आणि एनडीए या दोन आघाड्यांमध्ये आता रस्सीखेच होणार आहे .
दरम्यान महाराष्ट्रात महायुतीची महाविकास आघाडीने अक्षरशा वाट लावली 45 प्लस च्या वर्गाना करणाऱ्या महायुतीला जेमतेम 17 जागा मिळाल्यात ह्या उलट महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून महायुतीचे गर्वहरण केले आहे महायुतीच्या तीन मंत्र्यांचे तब्बल वीस खासदारांना महाराष्ट्रात पराभव पत्करावा लागला त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना खास करून नागपूरच्या नेत्यांना आता तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही
काल सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली लोकांना निकालाची मोठी उत्सुकता होती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुतेक निकाल आले आणि महाविकास आघाडीच्या खात्यात तब्बल 300 जागा पडल्या यामध्ये काँग्रेसला 13 शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार गट आठ तर महायुतीला भाजपला नऊ शिंदेघट सात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चेत राहिलेल्या सांगलीच्या जागेवर विशाल पाटलांनी विजय मिळवून उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का दिला
या निवडणुकीत मुंबईच्या सर्व जागा जिंकू अशी शेकी मिळवणाऱ्या महायुतीला मुंबईत फक्त दोन जागा जिंकता आल्या त्यातील उत्तर पश्चिम मुंबई मधून निवडून आलेले रवींद्र वायकर यांची खासदारकी आवड घटकाची ठरणार आहे कारण या निकालाच्या विरुद्ध शिवसेना न्यायालयात जाणार आहे तर मुंबईच्या सहा जागांपैकी दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे विजयी झाले तर उत्तर मुंबईची जागा भाजपला मिळाली इथून पियुष गोयल विजयी झाले
त्यावेळी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात अजित दादाच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पाणी पाजले तर दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पराभूत झाल्या जालन्या मधून केंद्रीय मंत्री रावसाहेब पराभूत झाले सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून नारायण राणे विजयी झाले तर रायगड मधून अजित पवार गटाचे एकमेव उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले ठाण्यातून मुख्यमंत्र्यांचे खासा.खास नरेश म्हस्के यांनी विद्यमान खासदार ठाकरे गटाच्या राजन विचारेंचचा पराभव केला तर कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव झाला महाराष्ट्रात चर्चेचा ठरलेल्या नाशिकमधून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पराभूत झाले नंदुरबार मधून भाजपच्या हीना गावित पराभूत झाल्या तर वर्धा मधून रामदास तडस या विद्यमान खासदारालाही पराभवाचा झटका बसला.
पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ प्रचंड मताने निवडून आले या मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेली रवींद्र धांगेकर पराभूत झाले .रावेर मधून एकनाथ खडसेंच्या सूनबाई आणि भाजपाचे उमेदवार रक्षा खडसे विजयी झाल्या पालघर मधून राजेश पाटील आणि ठाकरे गटाच्या हार्दिक कॉमेडी यांच्या मतविभाजने भाजपाचे डॉक्टर कडून आले
नागपूर मधून नितीन गडकरी काँग्रेस उमेदवारांनी भाजपच्या उमेदवाराला संपूर्ण निकालात उत्तर मध्य मुंबईतील निकाल खूपच महत्वाचा ठरला या मतदारसंघात भाजपने ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना तिकीट दिले होते परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांचा दादर पराभव केला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा शरद पवार गटाच्या नवख्या बजरंग सोनवणे 7000 मतांनी पराभव केला. महाराष्ट्रातील ही स्थिती पाहता आता महायुतीच्या आणि खास करून शिवसेना शिंदे गड अजित पवार गट आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात मोदींचा जराही करिष्मा चालला नाही मोदींनी महाराष्ट्रात जवळपास 25 सभा घेतल्या मोठमोठे रोड शो केले पण त्याचा काही उपयोग झालेला नाही ज्या उत्तर प्रदेशावर भाजपची मोठी मजा होती त्या उत्तर प्रदेशातील 80 पैकी 43 जागा इंडिया आघाडीने जिंकल्या तर भाजपाला केवळ 36 जागा मिळाले आहेत उत्तर भारतातील ईशान्य कडची राज्य सोडल्यास भाजपाला मोठे यश मिळालेले नाही केवळ मध्य प्रदेशात भाजपच्या 29 पैकी 29 जागा आल्या तर गुजरात मध्ये भाजपाला 26 पैकी 25 जागा मिळाल्या एका ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाला
गोव्यात काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी एक जागा मिळाली पश्चिम बंगालमध्ये ममताने भाजपाला बॅकफूटवर ढकलले असेच दिसते .