मुंबईत महाविकास आघाडीचाच बोलबाला
मुंबई/लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांपैकी महाविकास आघाडीच्या तर महायुतीने दोन जागा जिंकल्या त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीचा बोलबाला आहे बहुचर्चित दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आणि अरविंद सावंत सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले तर दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी शिंदे गटाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राहुल शेवाळे यांचा पराभव केला राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते होते त्यामुळे त्यांचा पराभव मुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवारी लागला आहे. उत्तर मध्य मुंबई सुप्रसिद्ध वकील एडवोकेट उज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली होती तर काँग्रेस कडून मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात होते वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांचा पराभव करून भाजपला मोठा धक्का दिला आहे .ईशान्य मुंबई भाजपचे खजिनदार मिहीर कोटेच्या यांचा शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिबा पाटील यांनी पराभव केला मीहीर हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला आहे
उत्तर पश्चिम मुंबईतील दोन शिवसेना आमदारांची लढत अत्यंत रंगतदार झाली शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात जबरदस्त स्टफ झाली शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल सांगता येत नव्हते पण अमोल कीर्तीकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले तर त्यानंतर रवींद्र वायकर यांनी मागणी केली काउंटिंग मध्ये अमोल कीर्ती का यांचा 48 मतांनी पराभव झाला आणि रवींद्र वायकर विजयी झाले आता या मतमोजणीला ठाकरे न्यायालयात आव्हान देणार आहे
उत्तर मुंबई मतदार संघात भाजपचे पियुष गोयल यादी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला तसे पाहता भाजपला मिळालेली खऱ्या अर्थाने ही एकमेव जागा आहे त्यामुळे मुंबई भाजपा आघाडीला मोठे अपयश आलेले आहे तर महाविकास आघाडीने घवघवी यश मिळवले
