ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

एकच वादा, प्रकाशदादा” नारा घुमणार-आमदार प्रकाश सुर्वेंचे उद्या बुधवारी होणार जंगी स्वागत

मागठाण्याच्या वीराची ठाण्याच्या महावीराला साथ

मुंबई- मागठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सुर्वेंच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता आमदार सुर्वेंच्या कर्मभूमीत त्यांचे उद्या बुधवारी सायंकाळी 5 वाजता जोरदार स्वागत होणार असून आतापर्यंतचे मोठे शक्तिप्रदर्शन मागठाण्यात होणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे यावेळी या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

प्रकाश सुर्वेंचे समर्थक, स्थानिक नागरिक आणि चाहते उद्या सायंकाळी संजय गांधी नॅशनल पार्क ते हॉटेल गोकुळ आनंद अशी रॅली काढणार आहेत. यावेळी सुर्वे समर्थक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सुर्वे यांचे जंगी स्वागत देखील करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत दहा हजार समर्थक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता गुलाल उधळत, फुलांचा वर्षाव करीत हे महास्वागत होणार असल्याचे समजते.

error: Content is protected !!