मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपले -पुढील तीन दिवस धोक्याचे
आभाळ फाटले जलप्रकोप !
मुंबई – सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काळ रौद्र रूप धारण करीत आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत होता या मुसळधार पावसाने काल दिवसभर रौद्र रूप धारण करून मुंबईसह संपूर्ण कोकणाला झोडपून काढले मुंबईत पावसाचा जोर इतका होता कि तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक सेवा कोलमडून पडली . पुढील दोन दिवशी असाच मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.
काळ मुंबईच्या कांदिवली,बोरिवली,मालाड,दहिसर,गोरेगाव, अंधेरी जॉईश्वरी वांद्रे या भागात मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे सखल भागात पाणी साचले अनेक रस्ते पाण्याखाली गेले मुंबईच्या रस्त्यानं अक्षरश नदी नाल्याचे स्वरूप आले होते. मुंबईच्या काही भागातील भुयारी मार्गात पाणी भरल्याने वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूनी बॅरिकेट्स लावून भुयारी मार्ग बंद केले. अंधेरी आणि मिलन सबवे मध्ये पाणी साचल्याने हे सबवे बंद करण्यात दुसरीकडे पालिकेचे कर्मचारी पंपिंग मशीनद्वारे सबवेतून पाणी काढण्याचा प्रयत्न करीत होते मुंबईच्या दादर, हिंदमाता , प्रभादेवी , सायं , गांधी मार्केट या भागात गुढगाभर पाणी साचले होते तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकाने बंद करण्यात आली मुंबईच्या तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे सकाळी काही चाकरमानी कामावर गेलेच नाही तर जे गेले त्यांचे परत येताना हाल झाले कारण रस्त्यावर पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती रिक्षा आणि टॅक्षीही रस्त्यावर दिसत नव्हत्या तर बेस्ट बसेस ट्राफिक मध्ये अडकून पडल्या होत्या. या पावसाचा सर्वाधिक फटका कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरला बसला . कोकणातील विशिष्ट, काळ , जगबुडी , भांगसाळ या सर्व नाडा दुथडी भरून वाहत होत्या त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पाणी शिरले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. एन दि आर एफ च्या टीम पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती मुंबई गोवा महामार्गावरची वॅह्युखी विस्कळीत झाली होती अनेक ठिकाणी दर्डी कोसळल्याने रस्त्यातच वाहने अडकून पडली होती कोकणातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले तिथल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, पालघर, आणि ठाणे या कोकणातील सर्व जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने या नदीकाठच्या गावांना सुरक्षित सुटली हलवण्यात आले आहे.कोल्हापुरात पंचगंगा दुथडी भरून वाहत असल्याने आणि नदीचे पाणी पातळी वाढल्याने कोल्हापूरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुख्यमंत्री शिंदे स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत आतापर्यंत साडेतीन हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे .