ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत

मुंबई/टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून भारतात परत आलेल्या रोहित शर्माच्या टीम इंडियाचे भारतात आणि खास करून मुंबई जंगी स्वागत करण्यात आले. वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत वर्ल्ड कप पटकावला होता. त्यानंतर आज टीम मीडियाचे सकाळी सहा वाजता भारतात आगमन झाले .सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली त्यांच्याशी दीड तास गप्पा मारल्या. आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजता टीम इंडियाचे सगळे खेळाडू मुंबईला आले. यावेळी मरीन लांईन येथून त्यांची ओपन डक मधून वानखेडे स्टेडियम परत मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीच्या वेळी टीम इंडियातील खेळाडूंना पाहण्यासाठी रस्त्यावर प्रचंड जनसमुदाय लोटला होता. तसेच वानखेडे स्टेडियम सुद्धा फुल झाला होता तब्बल दीड तास मिरवणूक चालू होती. त्यानंतर वानखेडे वर टीम इंडीयातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आणि त्यांना वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल 125 कोटीचे बक्षीस बीसीसीआय कडून देण्यात आले. टीम ईडियातील खेळाडूंच्या स्वागतासाठी अख्खी मुंबई लोटली होती .इतकी प्रचंड गर्दी आजवर मुंबईत कधीही बघायला मिळाली नव्हती. परंतु टीम इंडियाचे जोरदार स्वागत करीत ही गर्दी वानखेडे पर्यंत च
टीम चां ओपन बस बरोबर निघाली होती. त्यामुळे मरीन लायीन ते चर्चगेट या दीड किलो मीटरच्या अंतरासाठी तब्बल दीड तास लागला परंतु लोक जागचे हटले नाही. अशा पद्धतीने टीम इंडियाचे भारतात जोरदार स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!