बस मधील गर्दी चालते मग ट्रेन मधली का नाही ? न्यायालयाने सरकारला झापले
लोकल ट्रेनचा निर्णय १२ ऑगस्टला ?
मुंबई/ कोरोंनाची भीती दाखवून सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासास बंदी घालणारा उद्धव ठाकरे यांच्या महा विकास आघाडी सरकारला लोकल ट्रेनच्या मुद्द्यावर न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले तुम्हाला बस मधील गर्दी चालते .मग लोकल ट्रेन मधील गर्दीच का चालत नाही असा थेट सवाल न्यायालयाने विचारला . पुढील १२ऑगस्टच्या सुनावणीत याबाबत काय असेल ते स्पष्ट करा असे आदेश दिलेत.
मुंबई लोकल सुरू करा तसेच पत्रकारांना लोकल प्रवासाची परवानगी द्याशी मागणी करणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या त्यावर काल सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली .इतर इतर वाहणांमधली गर्दी चालते तर मग लोकल ट्रेन मधील का नाही असा थेट सवाल केला .त्यावर कोरोंना आटोक्यात आलेला नाही तिसऱ्या लाटेची भीती आहे अशा स्थितीत लोकल ट्रेन सुरु केल्यास रुग्णसंख्या वाढू शकते .त्यामुळे लोकल बाबतचा निर्णय जपून घेतला जाणार आहे असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले .त्याचबरोबर पत्रकारांना लोकल प्रवास नाकारणे आश्चर्यकारक आहे . याबाबत सरकारने खुलासा करायला हवा असे न्यायालयाने सांगितले .त्यामुळे आता लोकल ट्रेन बाबत पुढील १२ तारखेच्या सुनावणीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
लोकल ट्रेन ही मुंबई करांची जीवनवाहिनी असून रोज ८६ लाख प्रवासी लोकल ट्रेन ने प्रवास करतात मात्र कोरोंनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद आहे मधल्या काळात काही ठराविक वेळेत महिला व इतरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती .पण नंतर कोनोंनाचे रुग्ण वाढलायचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवास बंद आहे .केवळ आत्यवश्याक सेवेतील लोकांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे .त्यामुळे मुंबई बाहेरून नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना एस टी मधून प्रवास करावा लागतो आणि त्या प्रवासात जाता येता. सह तास लागतात त्यामुळे लोकल सर्वसामान्य जनतेसाठी खुली करा ही मागणी जोर धरू लागलीय आणि त्यातूनच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयाची भूमिका सकारात्मक असल्याने पुढील सुनावणीत या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
/जबाबदारीचे भान ठेऊनच निर्णय/मुख्यमंत्री
कोरोंना अजूनही आटोक्यात आलेला नाही त्यामुळे लोकल ट्रेन सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत जबाबदारीचे भान ठेऊनच निर्णय घेतला जाईल .याबाबत सरकार विचारविनिमय करीत आहे लोकांनी अजून काही काळ त्रास सहन करावा संयम सोडू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले