नवा पेच प्रंसग
महाराष्ट्रातील राजकीय पेच हा आता न्यायालयासमोर अवघड प्रश्नचिन्ह बनलेले आहे.कारण या प्रश्नावर विधानसभा,लोकप्रतिनिधी आणि राज्यपाल तसेच सभापती यांचे अधिकार अधोरेखित केले जाणार आहेत.या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या पाच याचिका दखल झाल्यात त्याच्यावरील सुनावणी संपूर्ण देशातील विधी मडले आणि लोकप्रतिनिधी साठी मार्गदर्शक ठरू शकणार आहेत
गेल्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीत कपिल सिब्बल,आणि हरीश साळवे या दोन ज्येष्ठ वकिलांनी कायद्याचा अक्षरशः किस काढला त्या दोघांनी त्यांच्या सुनावणीत उपस्थित केलेले प्रश्न हे घटनेच्या अभ्यासकांसाठी खरोखरच मार्गदर्शक ठरू शकतात. शिवसेना पक्ष सोडणाऱ्या 16 आमदारांचे निलंबन योग्य की अयोग्य तसेच त्यांनी काढले ला व्हीप योग्य की शिवसेना पक्षचे प्रतोद यांनी काढलेला योग्य त्याच बरोबर राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी बोलावले विधानसभेचे अधिवेशन हा त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य आदी प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात गेले दोन दिवस चर्चा झाली आणि यावर आता सोमवारी न्यायालय निकाल देणार आहे. या निकालात जर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर सरकारच कोसळेल आणि जर ते पात्र ठरले तर मात्र भविष्यात कुठलीही सरकारे कधीही कोसळू शकतात .कारण घटेंनेच्या अनुच्छेद 10 नुसार एखादा गट पक्षातून फिरून २/३ बहुमताच्या आधारे जर आपले बहुमत सिद्ध करू शकत असेल किंवा आपल्याला वेगळा गट म्हणून मानता मिळवून घेऊ शकत असेल तर देशाच्या कुठल्याही राज्यात अशा प्रकारे पक्षांतर्गत गटबाजी होऊन सरकारे कोसळू शकतात .बुधवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हीच भीती व्यक्त केलेली आहे .