ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कोकणातील रिफायनरी विरुद्धच्या आंदोलनात बंदी घातलेल्या ग्रीनपीस संघटनेचा हात -फडणवीस


मुंबई -कोकणातील बारसू इथं होणाऱ्या प्रस्तावीत रिफायनरीविरोधातील आंदोलनावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत निवदेन केलं. यावेळी त्यांनी बंदी असलेल्या ग्रीनपीस संस्थेचा या आंदलोनात हात असल्याचा गंभीर आरोप केला.
फडणवीस म्हणाले, काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती. माझा सवाल आहे की, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही. पुढची वीस वर्षे या राज्याची अर्थव्यवस्थेला आपण चालना देऊ शकतो त्याला विरोध करणं योग्य नाही.
कोर्टात गेल्यानंतर कुठल्याही तक्रारदारानं मारहाण केल्याची आणि चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केलेली नाही. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आलं. त्यामुळं यावर होणारे आरोप योग्य नाहीत.

error: Content is protected !!