दहा वर्षांच्या मुदतीच्या आत एसआरएची घर विकणाऱ्यांची यादी तयार करा -मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई/एस आर ए योजनेतील घरांमध्ये मूळ लाभार्थ्यांना डावलून इतरांना घुसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू होते त्याचबरोबर मुदतीच्या आत घरे विकण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत होत्या. पण आता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चाप लावला आहे एसआरए योजनेअंतर्गत मिळालेले घर दहा वर्षांच्या मुदतीच्या आत विकणाऱ्यांची यादी न्यायालयाला सादर करा असे आदेशच न्यायालयाने दिलेले आहेत.
मालाडच्या एस आर येतील घरांमध्ये मूळ लाभार्थ्यांऐवजी दुसरेच लोक राहत असल्याने याप्रकरणी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने एसआर येथील घरांची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करा असे आदेश याचा मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहेत त्याचबरोबर दहा वर्षानंतर घर विकण्यास इच्छुक असलेल्यांना एस्सारेकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जावे असेही आदेशात म्हटले आहे
एस आर ए च्या नियमानुसार दहा वर्षापर्यंत एस आर ए अंतर्गत मिळालेली रूम विकता येत नाही. पण मुंबईत अनेक ठिकाणी एसआरएच्या मूळ लाभार्थ्यांनी दहा वर्षाच्या आतच रूम विकलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने आता या घरांचे चेकिंग सुरू आहे ज्या लोकांनी दहा वर्षाच्या आत घर विकले आहे अशांची यादी तयार करून ती एस आर ए च्या संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश ही देण्यात आले आहे त्यामुळे अशा लोकांवर आता टागती तलवार आहे.