ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बांग्लादेशमध्ये हिंसक उठाव ३०० ठार – पंतप्रधान शेख हसीनाचे पलायन – हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड २ हिंदू नेत्यांची हत्या

ढाका- आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगला देशात हिंसक आंदोलन पेटले असून या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश डसोडून पलायन केले . त्या भारतात आल्या आहेत तिथून त्या इंग्लंड मध्ये राजाश्रय घेणार असल्याचे समजते. साध्य बांगलादेशचा ताबा लष्कराकडे असून लवकरच आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू असा दावा लष्करप्रमुखानी केला आहे दरम्यान बांगला देश मधील हिंसाचारात हिंदूंना टार्गेट करण्यात आले असून दोन हिंदू कोन्सलरची हत्या करण्यात आली तसेच इस्कॉन आणि कालीमाता मंदिराची तोडफोड करण्यात आली
बांगलादेश हिंसाचारामध्ये होरपळून निघत आहे. बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं. या हिंसक आंदोलनामुळे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हिंसाचार रोखण्यासाठी देशात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र बांगलादेश सरकार आंदोलकांवर ताबा घेऊ शकलं नाही. शेवटी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात अक्षरक्ष: पळून आल्या. बांगलादेशच्या लष्कराने देशावर ताबा घेतला या घटनेनंतर भारतात अलर्ट देण्यात आला असून बांगलादेश बरोबरच्या डीम सील केल्या जाणार आहेत

error: Content is protected !!